HISTORY

                       एखाद्या संताचे जिवन चरीत्र अभ्यासणे हे त्यांची भक्ती करण्यासारखेच असते. त्यांनी केलेल्या कार्याचे महत्व हे केवळ त्यांच्या जिवन काळा पुरते मर्यादित नसुन ते येणाऱ्या पिढयांसाठी मार्गदर्शनात्मक असते. भक्ती, नम्रता , विवेक, आणि निरागस भाव आपल्यामध्ये सदा प्रफुल्लीत राहावेत यासाठी झटणाऱ्या ,प्रसंगी आपल्या नश्वर शरिराची आहुती देणाऱ्या, या संतांच्या कार्याचा इतिहास आपण नेहमी जपायला हवा. श्री बिरबलनाथांचे कार्य वर्णन करणे म्हणजे सुर्याला दिवा दाख़वल्यासारखे आहे. त्याच्या महत्कार्याला समजावुन घेणे व त्या अनुषंगाने आपले आचरण असणे हि मुळ उद्दिष्टे मानुन आपण त्यांचा संक्षिप्त इतिहास जाणुन घेऊ.

आगमन :-
     

    नाथ पंथाच्या अनुयायांनी नाथ शब्दच मुळात शिव असा मानला आहे. या पंथाच्या सर्व तपस्वी लोकांनी आपल्या नावाच्या शेवटी ” नाथ ” हा शब्द उपयोगात आणला आहे. तर अशाच एका महान नाथपंथीय संताचे म्हणजेच श्री. बिरबलनाथ महारांजांचे मंगलपुरातील आगमन खुप कुतहुलात्मक आहे . असे म्हणतात की श्री. बिरबलनाथ महाराज पंजाब प्रांतातील चक्करपुर या गावचे राहणारे होते. हे गाव सिंधु नदिच्या काठावर वसलेले आहे . त्यांच्या जन्मस्थानाचा पत्ता पुर्णपणे मिळाला नाही . त्यांच्या आईचे नाव भगीरथीबाई व वडिलांचे नाव धर्मशिल होते.

        ते आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मराठा परिवारातून तसेच एक कठोर शिवभक्त असल्याचे समजते संस्थांचे याविषयी अधिक माहिती गोळा करणे सुरू आहे. नाथ संप्रदायात शिष्याच्या नावानंतर गुरुंचे नाव लिहीण्याची प्रथा आहे . त्यांच्या गुरु चे नाव जेसानाथ होते. श्री. जेसानाथ हे साक्षात मच्छिंद्रनाथाचे अवतार होते . जेसानाथ यांनी हरिव्दार येथील कुंभमेळ्यात बाबांना दिक्षा दिली होती . रामचंद्र बळीराम भोयर (साखरडोह) ह्यांच्या निवेदनानुसार बाबांनी बहोरमठ येथे कठोर तपश्चर्या केली. (बहोरमठ हरियाणा राज्यातील रोहतक जिल्ह्यात आहे) आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर गुरुंनी बाबांना नाथ पंथाच्या प्रचारासाठी आज्ञा केली . तेव्हा बाबा पंजाब प्रांतातुन नाथ पंथाचा प्रचारा करीत माहुर गडावर आले. दत्तात्रय प्रभुचे दर्शन करुन ते रात्रभर तेथेचे थांबले तेव्हा रात्री श्री. दत्तप्रभुंनी त्यांना दृष्टांत देऊन मंगरुळ गावी जाण्याची आज्ञा केली. प्रात:काळी नाथांनी दृष्टांतानंतर प्रभु दत्तात्रयाचे दर्शन घेऊन मंगरुळ गावाकडे जाण्याकरीता प्रस्थान केले.

कार्य :-

        मंगरुळनाथ या गावी बाबांचा मुक्काम श्री. देविसिंह जमादार यांच्या पुर्वजांनी त्यांच्याच वाड्याजवळ बांधलेल्या शिवमंदिराच्या परिसरातच असायचा. मंदिराजवळ पाण्याची विहीर होती. वडाच्या विशालकाय वृक्षाखाली धुनी पेटवुन बाबांनी आपले कार्य आरंभीले . श्री. संत बिरबलनाथ महाराज हे गोरक्षनाथाचे अवतार मानले जातात. भक्त सांगतात की प्रात:काळी विहीरीवर स्नान करुन बाबा प्रभु दत्तात्रयांचा जयजयकार करीत नंतर धुनिवर येऊन संपुर्ण शरीरावर भस्म लावित . बाबांची सकाळी व दुपारी गावात फेरी असे. भीक्षा मागुन त्यातुन फक्त एक दोन घास घेऊन बाकी अन्न ते प्राणीमात्राना खाऊ घालत ते प्रत्येक स्त्रीला माँ म्हणत . त्यांना लहान मुले व मुके प्राणी विशेषत: कुत्र्यांचा लळा होता.

       यातुन बाबांची भुतदया दिसुन येते. “झुले मे झुलता है बाला, दुनियाका पालनवाला” हाच बाबांचा मंत्र होता. त्यांना कित्येक प्रकारच्या वनौषधींचे ज्ञान होते. धुनीवर येणारे कित्येक भक्त त्यांनी दिलेल्या विभुतीने रोगातुन मुक्त झालेत.   पुढचे पान >>