HISTORY

               रस्त्याने निघाल्यानंतर फुटाणे विकणारया दुकानदाराजवळ थांबुन मुठभर फुटाणे आपल्या खिशात टाकत आणी दिवसभर लहान मुलांना ते फुटाणे वाटत पण फुटाणे संपत नव्हते असे एक ना अनेक लिला बाबा करित. त्यांना येणाऱ्या भेटवस्तु व पक्वान्न ते वाटुन देत. त्यांची भटकंती आजुबाजुच्या गावात पण असायची खडीधामनी, गिंभा, कुपटा, साखरडोह, शेलुबाजार, मानोरा,कारंजा, भिलडोंगर, रामगाव, रोहना, कोंडोली, लावणा, जयपुर,जनुना आणि आसपासचे जंगल इत्यादी ठिकाणी त्यांची विशेष भ्रमंती असे. त्या अनुषंगाने लोक त्यांना पृथ्वीनाथ या नावाने सुध्दा ओळखीत होते. नवरात्रोत्सव त्यांच्या अतिशय आवडीचा व ऊत्साहाने साजरा करणारा सण असे. त्यांची आदिशक्ती माँ दुर्गा वर अपार श्रध्दा होती. भक्तांसाठी वेळ प्रसंगी निसर्ग नियमांविरुद्ध जाऊन त्याचे दु:ख दुर केले.

                त्यांनी केलेले कार्य हे कोणत्याही आकलनशक्ती पलीकडचे आहे त्यांना योग विद्या सोबतच साबरी विद्या सुद्धा अवगत होती ते पोट फाडून लिव्हर बाहेर काढून धूत असत. चार फूट जाड व आठ फूट लांब लाकुड स्वत: हुन धुनीमध्ये पडणे, जळालेले कपडयांचे गठ्ठे जसेच्या तसे असणे, आटलेल्या विहीरीतुन पाणी काढणे, भक्ताच्या हरवलेल्या म्हशी परत आणणे, दारु (पिनपिनी) साठी एक रुपया मागणे, दारुचे दुध करणे, पूर आलेल्या नदिच्या पाण्याला वळवणे , सुर्य बनून लहान मुलांना वाट दाखवणे, मेलेले वासरु पुर्नजिवीत करणे, असे एक ना अनेक लिला बाबांनी केल्या.

समाधी :-

            संतांचे कार्य संपले की ते या जगाचा निरोप घेतात. लोकांना भक्ती व सत्कार्याचे मार्गदर्शन हाच त्यांच्या जिवनाचा, मुळ उद्देश्य असतो. एक दिवस बिरबलनाथ महाराज भक्तांबरोबर धुनीजवळ बसुन होते. अचानक त्यांना श्री. दत्त प्रभुंची आठवण आली ते म्हणाले की “गुरुदेव को मिलना है माहूरगड जाऐंगे “. दुसऱ्या दिवशी प्रात:काळी स्नानकरुन काही भक्तांना आपल्या सोबत घेऊन श्री. नाथजी माहूरगड जाण्यासाठी निघाले. पुर्ण यात्रा पैदलच होती. इश्वराच्या नामचिंतनातच रानावनातुन मुक्काम करत शेवटी एक दिवस नाथजी भक्तांसोबत माहूरगड येथे पोहोचले.
                        रात्री सर्वांनी तीथे मुक्काम केला. सकाळी उठल्यावर सर्व लोकांनी स्नान केले आणी नंतर दत्तात्रय प्रभुंच्या मंदिरात गेले आणी बाबांनी दोन्ही हात जोडुन प्रभुंच्या समोर बसुन म्हणाले की ” हे सदगुरू मैने आपकी आज्ञा और उपदेशका पालन किया , देश – परदेश घुमा, अपने भक्तोकी इच्छाको पुरा किया, नाथ संप्रदायका प्रचार किया, अब मेरा काम खत्म हो गया. यह आप जानते है प्रभु बुलालो मुझे सदा आपके चरणो मे रहने की इच्छा है ” असे म्हणुन नाथांची समाधी लागली. बाबांना प्रभुजवळ असे बोलतांना भक्तांना खुप आश्चर्य वाटले आणि सर्वाच्या मनात भिती उत्पन्न झाली.
                 शरीराने नाथजी आता थकले होते. त्यांचे सर्व केस पांढरे झाले होते. शरीराच्या पेशींनी हाडांची साथ सोडली होती. चेहरयावर आणी शरीरावर झुरळ्या पडल्या होत्या. इतके असुन सुद्धा बाबांच्या चेहरयावर पुर्वीप्रमाणेचे तेज होते. वृद्धावस्थेत सुध्दा बाबांच्या चालण्यात फरक पडला नव्हता. जागोजागी फिरुन बाबा आपल्या भक्तासोबत मंगरुळगावी आले. सर्व भक्तांना बोलावुन त्यांनी घोषणा केली की येणाऱ्या माघ पौर्णिमेस आम्ही जिवंत समाधी घेऊ, हि गुरूदेवांची आज्ञा आहे. बाबांच्या समाधीची वार्ता चोहिकडे पसरली. हे ऐकून भक्तांना फार दु:ख झाले. सर्व भक्त बाबांना आपआपल्या गावात घेऊन जाण्यासाठी स्पर्धा करु लागले.
                      परंतु बाबांनी श्री लालसिंह यांच्या माता बुंदाबाई यांना मंगरूळ गावातच समाधी घेण्याचे वचन या आधीच दिलेले होते त्याकरिता बुंदाबाईंनी श्री बिरबलनाथ महाराजांना आपली स्वतःची जागा सुद्धा दानपत्र करून दिली होती त्यामुळे श्री बिरबलनाथ महाराजांनी आपल्या समाधीची जागा अगोदरच निश्चित केलेली होती. बाबांनी  वयाच्या अंदाजे 80 व्या वर्षी संध्याकाळी सहा वाजता तत्कालीन जिल्हाधिकारी आर एन बॅनर्जी साहेब अकोला व त्यांच्या सुविध्य पत्नी तसेच सर्व अधिकारी वर्ग व हजारो भक्तांच्या साक्षीने माघ शुद्ध पौर्णिमा शके १८४९ संवस्तर १९८४ दिनांक ०४/०२/१९२८ शनिवार रोजी संध्याकाळी सहा वाजता जिवंत संजीवन समाधी घेतली. आपले कार्य आणि शरीराचा उदेश झाला असला तरी मी सदैव येथेच राहिन, खर्‍या अंत:करणाने जो मला आवाज देईल त्यांच्या मदतीला मी धावुन येईल हे नाथांचे वचन आहे.    << पहीले पान