HOME

श्री बिरबलनाथ महाराज : 

                   अध्यात्मिक क्षेत्रात भारत प्राचिन काळा पासुनच समृध्द राहीलेला आहे. इथल्या अनेक महान योगी व ऋषिंनी अध्यात्मिक मार्गाने इश्वर प्राप्तिचे निरनिराळे उपाय सांगितले आहेत. भारतात योगी व महाऋषिंचे वेगवेगळे पंथ आहेत. यातच एक प्राचिन नाथपंथ असुन या पंथाच्या शाख़ा व उपशाख़ा देशाच्या अनेक भागात आढळतात या पंथात गुरुला असाधारण महत्व दिले जाते व गुरुनी सांगितलेल्या मार्गावर भक्त आपली भक्ती अनुसरतात. विदर्भात अकोला या जिल्ह्यापासुन ६५ कि. मी. दुर पश्चिमेला मंगरुळनाथ (मंगरुळपीर) ज्याचे काही वर्षांपृर्वीचे नाव “मंगलपुर” असे आहे हे तिर्थक्षेत्र म्हणुन प्रसिद्ध असुन संतांची भुमी आहे. दक्षिणेस वाशीम हे शहर ४० कि. मी. दुर व उत्तर दिशेला कारंजा (लाड) २७ कि. मी. दुर आहे.

              १९ व्या शतकात श्री बिरबलनाथ महाराजांच्या पवित्र चरणांनी या भुमीला स्पर्श करुन धन्य केले. मंगरुळनाथ ही त्यांची कर्मभुमी म्हणुन प्रसिद्ध आहे. त्यांनी सामाजीक सहिष्णुता जपुन लोकांना एकत्र आणण्याचे कार्य केले. मनापासुन श्रध्दा असणार्या भक्तांना त्यांनी आपलेसे केले. व्यक्ती असो किंवा मुक प्राणी त्यांच्या प्रेमाची प्रचिती सर्वाना आली. गरिब – श्रीमंत, अजाण – ज्ञानी, हा भेदभाव न मानता त्यांनी आपले सत्कार्य लोकांसाठी अर्पण केले.

           माघ शध्द पौर्णिमेस शके १८४९ संवत्सर १९८४ ता. ४/२/१९२८ या दिवशी महाराजांनी जिवंत समाधी घेऊन त्यांनी आपला देह त्यागला त्यांच्या पुण्यातिथीच्या पाचव्या दिवशी महायात्रा भरवण्याचा नित्यक्रम आजही यथावह सुरु आहे.

***********************************